आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवीदान समारंभ:दानकुँवर महिला महाविद्यालयाच्या पहिल्या‎ पदवीदान समारंभात 32  विद्यार्थिनींना पदवी‎

जालना‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एरव्ही विद्यापीठ स्तरावर होणारा‎ पदवीदान समारंभ विद्यापीठाच्या‎ नियोजनानुसार विद्यार्थी ज्या‎ विद्यालयात शिक्षण घेतात, त्याच‎ ठिकाणी घेण्याची सुविधा उपलब्ध‎ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील‎ पहिला महाविद्यालय स्तरावरील‎ पदवीदान समारंभ जालन्यातील‎ श्रीमती दानकुँवर महिला‎ महाविद्यालयात पार पडला. या‎ समारंभात तब्बल ३२ विद्यार्थिनींना‎ पदवी प्रदान करण्यात आली. यासाठी‎ सिनेट सदस्य तथा आमदार कैलास‎‎‎‎‎‎‎‎‎‎ गोरंट्याल यांची प्रमुख उपस्थिती‎ होती.‎ श्रीमती दानकुंवर महिला‎ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा‎ पदवी ग्रहण समारंभ घेण्यात आला.

‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष‎ महेंद्रकुमार गुप्ता हे होते. तर प्रमुख‎ पाहुणे म्हणून आमदार तथा डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा‎ विद्यापीठाचे सिनेट सदस्य कैलास‎ गोरंट्याल उपस्थित होते. संस्थेचे‎ कोषाध्यक्ष संजय अग्रवाल,‎ संचालक,नरेश अग्रवाल, विनोद‎ अग्रवाल तसेच प्राचार्य प्रा. डॉ. विजय‎ नागोरी, उपप्राचार्य प्रा. डॉ. विद्या‎ पटवारी, प्रा. डॉ. जितेंद्र अहिरराव‎ तसेच विद्यार्थी संसदेची सचिव‎ प्रियंका गुमलाडू उपस्थित होते.‎ यावेळी हाती विद्यापीठाचा ध्वज घेत‎ फेरी तसेच विद्यापीठ गीत घेण्यात‎ आले. याप्रसंगी बीए, बीकॉम, तसेच‎ एमकॉमच्या एकूण ३२ विद्यार्थिनींना‎ पदवी प्रदान करण्यात आली. या‎ कार्यक्रमासाठी एकूण ९३‎ विद्यार्थिनींनी पदवी प्राप्त करण्यासाठी‎ महाविद्यालयाकडे नोंदणी केली होती.‎

बातम्या आणखी आहेत...