आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जालना विभागातून 8 महिन्यांत 331जणबेपत्ता; 64 जणांचा पोलिसांना लागेना शोध;मिसिंगच्या तक्रारी वाढल्या

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना विभागातील पाच पोलिस ठाण्यांतर्गत आठ महिन्यांत ३३१ जण बेपत्ता झाले होते. त्यात २६७ जणांचा पोलिसांनी शोध लावला आहे. अजूनही ६४ जणांचा शोध सुरू असून यात २४ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मागील आठ महिन्यांची आकडेवारी पाहिली असता दिवसाला दोन ते चार जण बेपत्ता होत आहेत.कौटुंबिक संबध, पालक-मुलांतील संवादाचा अभाव, पती-पत्नीतील विसंवाद, अपहरण, ताणतणाव, तरुणाईत वाढलेले प्रेमाचे आकर्षण, प्रलोभनाला बळी पडून मुले, मुली, महिला, तरुण, पुरुष बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, जालना शहरासह परिसरातील गावांतून मागील आठ महिन्यांमध्ये २९० जण बेपत्ता झाले होते.

पोलिसांनी काही जणांना मुंबई, पुणे, गोव्यासारख्या ठिकाणाहून शोधले आहे. दिवसेंदिवस बेपत्ता व्यक्ती होण्याचे प्रकार वाढत असल्यामुळे पोलिस प्रशासनाने यासाठी स्वतंत्र यंत्रणा काम करू लागली आहे. बेपत्ता मुली, महिला, पुरुष, तरुणांना शोधण्यासाठी ठाणेनिहाय स्वतंत्र पोलिसांची नियुक्ती केली आहे. काही काळ ऑपरेशन मुस्कान नावाची शोधमोहीम राबवली होती. १८ वर्षांपुढील व्यक्ती गायब झाल्यास ‘मिसिंग’ची तक्रार दाखल करण्यात येते. नातेवाइकांकडून लैंगिक छळ, नोकरीचे आमिष, लग्नाचे आमिष या कारणांमुळे महिला घरातून निघून गेल्या.

कौटुंबिक वादातून हरवलेल्या महिला परत येण्याचे प्रमाण अधिक आहे. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, डीवायएसपी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय ज्ञानेश्वर पायघन, रामेश्वर जायभाये, रघुनाथ नाचण, शिवाजी बंटेवाड या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत धस, साई पवार आदी परिश्रम घेत आहेत.

महिनानिहाय बेपत्ता पुरुष अन् महिला
जानेवारी ते फेब्रुवारीत ९७, तर महिला ६०, मार्च ते एप्रिल १४२ तर ८२ महिला, मे ते जून १६७ तर ८६ महिला, जुलै ते ऑगस्ट १२५ जण महिला ६४, सप्टेंबर महिन्यात ६३ जण बेपत्ता झाले असून यात ३० महिला व मुलींचा समावेश आहे. बहुतांश जणींचा तपास लागला आहे.दरम्यान, जिल्ह्यात रोज चार जण बेपत्ता होत आहेत.

बहुतांश बेपत्ता व्यक्तींचा शोध
बेपत्ता व्यक्तींना शोधण्यासाठी स्वतंत्र पोलिस यावर कामे करीत आहेत. याचा दर महिन्याला क्राइम मीटिंगमधून आढावा घेतला जातो. बेपत्ता व्यक्ती घरी आल्यानंतर पोलिसांना याचीही माहिती देत राहावी, जेणेकरून तो बेपत्ता आहे, अशी पोलिसांकडून नोंद राहणार नाही याची काळजी घ्यावी. - डॉ. अक्षय शिंदे, पोलिस अधीक्षक, जालना.

बातम्या आणखी आहेत...