आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎ पोषण आहार:36 शाळांना सहा महिन्यांपासून‎ पोषण आहाराची देयकेच नाहीत‎

धावडा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांची गळती थांबावी तसेच सदृड आरोग्य रहावे‎ यासाठी सुरू करण्यात आलेल्या पोषण आहार‎ उपक्रमाला प्रशासनाकडून खोडा घालण्याचा प्रकार‎ सुरू झाला आहे. तालुक्यातील तब्बल ३६ शाळांना‎ सहा महिण्यांपासून पोषण आहाराची बीले मिळाली‎ नसल्याने मुख्याध्यापक अडचणीत सापडले आहेत.‎ भोकरदन तालुक्यातील ३६ शाळांना माहे जून ते‎ जानेवारी या कालावधील इंधन व भाजीपाला यांची‎ देयके अद्यापही निघाली नाहीत. वदोड तांगडा‎ केंद्रातील २७ शाळांना हे देयके मिळाली नाहीत यामध्ये‎ जिल्हा परिषद हायस्कूल धावडा, वालसावंगी, वडोद‎ तांगडा, प्राथमिक शाळांमध्ये धावडा मराठी व उर्दू‎ तसेच वालसावंगी मराठी व उर्दू या मोठ्या शाळांचा‎ समावेश आहेत.

ज्यांचे विद्यार्थी हे २०० हून अधिक‎ आहेत. जून ते आजपर्यंत एक पैसाही इंधन व‎ भाजीपाला याचा मिळाला नाही.‎ पोषण आहार योजनेसाठी पैसे कोठून आणावे हा गंभीर‎ प्रश्न मुख्याध् यापकांना पडला आहे. दोन महिन्यांपूर्वी‎ शिक्षणा धिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी व‎ जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊनही‎ अद्याप कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही.‎ वरील प्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा उपोषनाचा मार्ग‎ स्वीकारावा लागेल असे अपग्रेड मुख्याध्यापक‎ महासंघाचे नेते अजहर पठाण, रवींद्र काकडे, जिसुफ‎ सय्यद, अनिल बोराडे, दशरथ बडगे, भानुदास काळे‎ आदींनी केली आहे. याबाबत प्रशासनाने तत्काळ गंभीर‎ दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...