आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा:एमपीएससी’ला 369 उमेदवार गैरहजर, 1276   जणांनी दिली परीक्षा

जालना23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त सेवा पूर्व परीक्षा ही शनिवारी (दि.५) जालना शहरातील ६ उपकेंद्रावर सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० या वेळेत घेण्यात आली. या परीक्षेसाठी पात्र १६४५ पैकी ३६९ जण गैरहजर राहिले, तर १२७६ जणांनी पेपर दिला.

केंद्रनिहाय हजर-गैरहजर उमेदवार असे : मत्स्योदरी शिक्षण संस्था, अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय, औरंगाबाद रोड, नागेवाडी (२४३-६९), शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, नागेवाडी (१८९-५१), बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, नवीन एमआयडीसीजवळ, औरंगाबाद रोड (१९८-४२), अंकुशराव टोपे महाविद्यालय, मोतीबागेजवळ (२६०-७६), श्री सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, टाऊन हॉलजवळ (१७४-५५) व सीटीएमके गुजराथी हायस्कूल, मुथा बिल्डिंगजवळ, सरोजिनीदेवी रोड (२१२-७६) अशा प्रकारे १६४५ पैकी १२७६ जण हजर, तर ३६९ जण गैरहजर राहिले.

सदरील परीक्षेच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत शांतता राखण्यासाठी केंद्राच्या १०० मीटर परिसरात सकाळी ९ वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत अपर जिल्हाधिकारी केशव नेटके यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते. शिवाय या परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी बूथ, फॅक्स, झेरॉक्स केंद्र व ध्वनिक्षेपके परीक्षेच्या कालावधीत बंद होते. तसेच प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त होता. यामुळे परीक्षा शांततेत व सुरळीत पार पडल्याचे परीक्षा नियंत्रकांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...