आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी:जामखेडला 37 लाख रुपयांचा निधी

अंबड5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंत्री रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे यांच्या विशेष प्रयत्नातून जामखेडला विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या ३७ लाख रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते झाले.

अंबड तालुक्यातील खडकेश्वर महादेव मंदिर समोर सभा मंडप बांधकाम करणे, गणपती मंदिरासमोर सभामंडप बांधकाम करणे, पंचमुखी गणपती मंदिरासमोर सभामंडप बांधकाम करणे, माळी गल्ली येथे सिमेंट रस्ता बांधकाम करणे, धनगर गल्ली येथे सिमेंट रस्ता बांधकाम करणे, आबा भोजने यांच्या घरापासून तर झोपडपट्टी पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे आदी ३७ लक्ष रुपयाच्या विकास कामाचे भूमिपूजन आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते झाले.

यावेळी उपस्थित भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दीपक ठाकूर, भाजपा जिल्हा सरचिटणीस अवधूत नाना खडके, भाजपा तालुकाध्यक्ष जितेंद्र पालकर, माजी जिप सभापती भीमराव डोंगरे, पंचायत समिती सदस्य भगवान भोजने, भगवान धुळे, गुलाब अण्णा पागिरे, परमेश्वर लेंभे, नाथाभाऊ भोजने, सचिन जाधव, संभाजी भोजने, कुरील साहेब, शेख साहेब, डॉक्टर गंगाधर पांढरे, भगवान जिजा भोजने, भीमराव पवार, शेख जमील, इमरान कुरेशी, अण्णा मामा उडान, हरिश्चंद्र भोजने, दीपक पांढरे, मंजीत भोजने, आबा भोजने, सुरज पांढरे, सय्यद जाकीर, जगन जाधव, रामेश्वर वैद्य आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...