आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:आष्टी ठाण्यातील शिबिरात 38 रक्तदात्यांचा सहभाग

आष्टीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परतूर तालुक्यातील आष्टी पोलीस ठाण्यात गुरूवारी रक्तदान शिबीर घेण्यात आले या शिबीरात ३८ जणांनी रक्तदान केले जालना जिल्हा पोलीस दल जातीय सलोखा अभियान अंतर्गत आष्टी पोलीस ठाण्यात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यात साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सावळे. ग्रामविकास अधिकारी डी बी काळे. पोलीस कर्मचारी ग्रामपंचायतचे अधिकारी व गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून ३८ रक्तदात्यानी रक्तदान केले.

यावेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सावळे म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक मोठ मोठ्या दवाखान्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा झाल्याने रूगणाना आपले जीव गाण्याची वेळ येऊ नये यासाठी गावा गावात समाजसेवकानी व विविध पदाधिकारी. नागरिकांनी रक्तदानाचे शिबीर घ्यावेत असे आव्हान केले या रक्तदानासाठी जालना येथील जनकल्याण रक्त पेढी चे डॉ राजकुमार झंवर. वदंना शेळके. मनिषा पटेल. प्रविण द्रुगम. अभिमान जोशी. याच्या सह पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, आष्टी पोलीस ठाण्यात आयोजित रक्तदान शिबीरात रक्तदात्यांना प्रमाणपत्र देतांना एपीआय संदीप सावळे ग्राम विकास अधिकारी डी. बी. काळे व जनकल्याण रक्तपेढी चे कर्मचारी उपस्थित हेाते.

बातम्या आणखी आहेत...