आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांचे हाल:प्रवासी असतानाही जालना-सिल्लोड मार्गावर एसटीसाठी 4 तासांची प्रतीक्षा

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्याच्या एका फेरीपेक्षा दीडपट उत्पन्न अवघ्या ६८ किमी सिल्लोडच्या फेरीतून मिळते. मात्र, तरीही सकाळी ९ ते १२ तसेच दुपारी तीन वाजेनंतर सायंकाळी ७ पर्यंत म्हणजे तब्बल चार तास एकही एसटी या मार्गावर सोडली जात नाही. या मार्गावर जालना, अंबड तसेच सिल्लोड या तिन्ही आगारांकडून बसेस सोडण्यासाठी कुचराई केली जात आहे. परिणामी या मार्गावरील प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

जालना ते भोकरदन हा अवघा ५२ किमी अंतराचा रस्ता आहे. हा रस्ता खराब झाल्याने या मार्गावरून जाणाऱ्या मोठ्या वाहनांची संख्या कमी झाली आहे. या रस्त्याला पर्याय म्हणून वाहनधारक जालना, देऊळगावराजा, जाफराबाद पुढे भोकरदन असा २८ किमी अंतराचा अधिकचा वळसा घेत आहेत. या मार्गावरील एसटीची सेवा सुरूच आहे. मात्र, एसटी महामंडळाकडून या मार्गावर बस सोडण्याचे नियोजन कोलमडले आहे. मराठवाडा तसेच खान्देश या भागाला जोडणारा मार्ग म्हणून जालना-सिल्लोड हा रस्ता मानला जातो. जालन्यातून राजूर, भोकरदन पुढे सिल्लोड जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसाला हजारपेक्षा अधिकच आहे. या प्रवाशांना तासन््तास एसटीची वाट पाहावी लागते. केंद्रातील मंत्री, आमदार तसेच मातब्बर राजकारण्यांचा बालेकिल्ला असलेल्या भोकरदनला जाण्यासाठी सामान्य नागरिकांचे मात्र माेठे हाल होत असून याकडे किमान सत्ताधाऱ्यांनी तरी लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांतून हाेत आहे.

तक्रारींवर कार्यवाही नाही सप्टेंबर महिन्यात जालन्यातील सतीश मगर यांना भाेकरदनला जाण्यासाठी सकाळी ७ ते ८:३० या वेळेत एकही बस लागली नाही. या वेळेत अंबड - सिल्लोड, अंबड - जळगाव, सिल्लोड, भोकरदन अशी एकही बस लागली नाही. याबाबत तक्रार नाेंदवलेली असतानाही २३ सप्टेंबरपर्यंत या तक्रारीवर स्थानक प्रमुख, आगारप्रमुख, आगार लेखाकार अशा एकाही अधिकाऱ्याने कार्यवाही केली नाही. अशा अनेक काही तक्रारी तब्बल दोन ते अडीच महिन्यांपासून केवळ नोंदवलेल्या आहेत.

रविवारची जालना स्थानकावरची स्थिती अशी रविवारी सकाळी ११ वाजता जळगाव जाणारी बसेस जालना स्थानकावर दाखल झाली. त्यानंतर ११ : ३० वाजेपर्यंत एकही बसेस आली नाही. सिल्लोड येथून या वेळेत दोन फेऱ्या अपेक्षित आहे. मात्र दिवसातून दोन ते तीन फेऱ्या त्यांच्या झाल्या. तर अंबड, जालना आगारातूनही भोकरदन, सिल्लोड मार्गावर बसेस साेडण्यात आल्या नाही, तर नियमित सायंकाळी चार वाजेनंतर जालना बसस्थानकातून सिल्लोड किंवा भोकरदन या मार्गावर एकही एसटी सोडली जात नाही. बीड येथून सोयगाव जाणारी ४ ते ४: ३० ही बसची सेवा कधी सुरू, तर कधी बंद असते. त्यानंतर ६ ते ७ या वेळेत दोन बसेसचे नियोजन असते. मात्र या बसेसही कधी ७ तर कधी नऊ वाजता जालना बसस्थानकातून सोडतात.

वाहतूक नियमांचे होते उल्लंघन अडीच ते तीन तासांची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना एसटी लागल्यास यामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होते. एसटीत बसण्याची क्षमता तसेच उभे राहण्याची क्षमता ठरलेली आहे. जर ४० प्रवासी बसू शकत असेल तर त्यामध्ये २५ टक्के म्हणजे १० प्रवासी उभे राहू शकतील, असे परिवहन विभागाचा नियम सांगतो. मात्र, सायंकाळच्या वेळी जालन्यातून सिल्लोडकडे जाणाऱ्या बसेसमध्ये या नियमांचे उल्लंघन होते. हा प्रकार प्रवाशांच्या जिवाशी खेळणारा ठरतो.

बसेसचे नियोजन करू जालना-सिल्लोड मार्गावरील बसेसचे नियोजन करण्यासाठी जालना स्थानकप्रमुख तसेच आगारप्रमुख यांच्याकडून नियोजन मागवण्यात येत आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेता अधिक बसेसच्या फेऱ्या होतील यावर भर दिला जाईल. - प्रमोद नेहुल, विभाग नियंत्रक, जालना

बातम्या आणखी आहेत...