आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंडा:बचत गट सदस्यांना चार लाखांचा गंडा

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका बॅंकेकडून महिला बचत गटाच्या सदस्यांना लोन देतो म्हणून तिघांनी प्रोसेसिंग फिस व इतर फिसच्या नावाखाली ४ लाख ५४ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदनझिरा येथील साजन तुपे या कृपा महिला बचत गटासाठी सदस्य मिळवून देण्याचे काम करतात. त्यांनी आजपर्यंत जवळपास ८६ सदस्य मिळवून दिले.

कृपा महिला बचत गटाचे संशयित सुरेश बसप्पा मल्ली (रा. मावळ, जि. पुणे) यांच्यासोबत दोन महिला काम पाहतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदस्यांना २१ दिवसांत एका बॅंकेकडून लोण मिळवून देतो, असे खोटे आश्वासन दिले. याकरिता प्रोसेसिंग फिस व इतर फिसच्या नावाखाली फिर्यादी व सदस्यांकडून ४ लाख ५४ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम घेतली. बचत गटांच्या ९ सदस्यांना एचडीएफसी बॅंकेचे ३ लाख रुपयांचे बोगस चेक देवून स्वत:च्या फायद्यासाठी फिर्यादीची व साक्षीदारांची फसवणूक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...