आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पगार:तीन पालिकांमध्ये शहर समन्वयक पदांच्या 4 जागा, 45 हजार पगार

जालना18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणासाठी फुलंब्री नगरपंचायतींमध्ये एक,परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नगर परिषदेत एक आणि आैरंगाबाद महानगरपालिकेत दाेन जागा अशा एकूण शहर समन्वयक पदांच्या ४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून आॅनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. फुलंब्री नगरपंचायत येथे ११ महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने शहर समन्वयक पद भरण्यात येणार आहे.

यासाठी इच्छुक उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातील बीई, बीटेक, बी.आर्क, बी. प्लानिंग, बीएस्सी शाखेचा पदवीधर असावा. वयोमर्यादा ३५ वर्ष असावी. इच्छुक उमेदवारांनी २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी phulambri.nagar.panvhyat@gmail.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. परभणी जिल्हयातील गंगाखेड येथे शहर समन्वयक पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुकांनी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावेत.

बातम्या आणखी आहेत...