आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:4 विद्यार्थ्यांचा राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते गौरव; महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट व गाइड मुंबईकडून राज्यस्तरीय राज्य पुरस्कार प्रमाणपत्र वितरण

जालना18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थी दशेत व्यवाहाराचे तसेच संस्काराचे धडे देणाऱ्या स्काऊट गाईड चळवळीत जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर जालन्याचे नाव झळकवले. चळवळीत जिप प्राशा चनेगाव येथील गोपाल राजू आंबेकर, ऑक्सफर्ड इंग्लिश हायस्कूलची साक्षी विजय वानखडे, रक्षित संजय रजाने तसेच श्री. शिवाजी हायस्कूल गांधीचमन येथील कुमारी श्रद्धा भागवत सातपुते यांचा समावेश आहे. या चौघांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड मुंबईच्या वतीने वर्ष २०१८-१९ व १९ -२० या दोन वर्षातील राज्यस्तरीय राज्य पुरस्कार प्रमाणपत्र वितरण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कुशारी यांच्या शुभहस्ते स्काऊट-गाईड पॅव्हेलियन शिवाजी पार्क दादर, मुंबई येथे नुकतेच संपन्न झाले. या वेळी महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईडचे अध्यक्ष तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार सुनील केदार, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे तसेच स्काऊट गाईडचे राज्य मुख्य आयुक्त तथा क्रीडा व युवक कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, राज्य चिटणीस एन. बी. मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यातील एकूण १४५ स्काऊट गाईड यांना बोलवण्यात आले होते. यामध्ये जालना जिल्ह्यातील चार स्काऊट गाईडचा यांचा समावेश होता. त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चनेगाव या शाळेतील गोपाल राजू आंबेकर, ऑक्सफर्ड इंग्लिश हायस्कूल या शाळेतील कुमारी साक्षी विजय वानखडे, रक्षित संजय रजाने व श्री. शिवाजी हायस्कूल गांधीचमन जालना या शाळेतील कुमारी श्रद्धा भागवत सातपुते याचा स्काऊट गाईडचा जिल्ह्याच्या वतीने निवड करण्यात आली होती. त्यासोबतच युनिट लीडर म्हणून रमेश भागवत व विनोद चौबे यांचा समावेश होता.

या निवड झालेल्या सर्व स्काऊट गाईड च्या विद्यार्थ्यांचा राज्यपाल माननीय भगतसिंग कुशारी यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जालन्यातील चार स्काऊट गाईचा गौरव स्काऊट गाईडचे अध्यक्ष भीमराव डोंगरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी तथा जिल्हा मुख्य आयुक्त कैलास दातखीळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे, उपशिक्षणाधिकारी बी. आर. खरात, विपुल भागवत, जिल्हा प्रशिक्षण व्ही. बी. गायकवाड, अख्तर जहाँ कुरैशी, जिल्हा संघटक के. एल. पवार, सोनिया शिरसाट तसेच ऑक्सफर्ड शाळेच्या संचालिका खमर सुलताना, शिवाजी हायस्कूल चे मुख्याध्यापक वसंत घुगे, स्काऊट मास्टर विनोद चौबे, लक्ष्मण मुटकुळे, रमेश भागवत तसेच जिल्ह्यातील स्काऊट गाईड चळवळीतील सर्व शुभचिंतक, पालक यांनी या निवड झालेल्या चारी स्काऊट गाईडचे अभिनंदन आणि कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...