आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्र तपासणी:सिपोराबाजार येथे नेत्र तपासणी शिबिरात‎ 400   रुग्णांची करण्यात आली तपासणी‎

भोकरदन‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सिपोराबाजार येथे नवीन‎ वर्षाची सुरुवात सामाजिक उपक्रमाने‎ करीत तसेच ३ जानेवारी क्रांतीज्योती‎ सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे‎ औचित्य साधून लायन्स क्लब‎ औरंगाबाद व अभियान लोकजागर‎ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र‎ तपासणी व आरोग्य तपासणी कॅम्पचे‎ आयोजन करण्यात आले होते.‎ भायडी जिल्हा परिषद सर्कल मध्ये या‎ अभियानांतर्गत ४०० लाभार्थ्यांची आरोग्य‎ तपासणी तसेच नेत्र तपासणी करण्यात‎ आली.

यामध्ये १३० लाभार्थी मोतीबिंदू‎ ऑपरेशनसाठी लायन्स क्लब औरंगाबाद‎ येथे पाठवण्यात येणार आहेत. या‎ कार्यक्रमासाठी मनिषा जंजाळ,‎ लोकजागर संघटनेचे अध्यक्ष केशव‎ जंजाळ, सुदाम देठे, लक्ष्मण पाटील,‎ देवराव कड, नाजेम भाई, बशिर भाई,‎ दादाराव कड, सुभाष पोटे, गजानन कड,‎ शालिकराव मास्तर, भगवान घायवट,‎ बळीराम गावंडे, गजानन भालेकर,‎ समाधान कड, राजू कड, तुळशीराम‎ मास्तर, सतीश रिंडे, शिवाजी गिरणारे,‎ धोंडीराम जामुंदे, शेख मतीन, जावेद‎ शहा, दिनकर जाधव, भगवान कुदर,‎ पंडित गावंडे, डॉ. ईश्वर वाघ, संजय‎ वाघ आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...