आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्ष लागवड:ग्रीन सिटी क्लीन सिटी उपक्रमांतर्गत चार हजार वृक्षांची होणार लागवड, आज प्रारंभ

जालना6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लायन्स क्लब ऑफ जालना डायमंड तसेच रूपम स्टील यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रीन सिटी क्लीन सिटी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून ४ हजार रोपट्यांची लागवड होणार असून याची सुरुवात रविवारी होत आहे. दरम्यान, प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी होत किमान एक वृक्षाची लागवड करावी, असे अवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

लायन्स क्लब ऑफ जालना डायमंड ३२३४ एच २ व किशोर अग्रवाल, रूपम स्टील जालना यांच्या संयुक्त विद्यमाने वन विभाग सिं. राजा चौक ते माळाचा गणपती रस्त्याच्या दुतर्फा सुमारे ४००० वृक्षांची लागवड व संगोपनाला २४ जुलै रोजी सकाळी १० वाजता सुरुवात करून २०२२-२३ या वर्षात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक सेवा करण्याचा संकल्प लायन्स क्लब ऑफ जालना डायमंड ३२३४ एच २ घेण्यात येत आहे. जालना शहरातील नागरिकांनी ग्रीन सिटी क्लीन सिटी हे मूल्य जोपासून किमान एक तरी झाड लावून सहकार्य करावे, असे आवाहन लायन्स क्लबने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...