आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरतूर तालुक्यातील आष्टी येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरात गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत विविध विकास कामांना मंजूरी देण्यात आली. या वेळी सिंचन विहिरींसाठी ४०३ प्रस्ताव दाखल झाले आहेत. गुरुवारी आष्टी येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरात विषेश ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सरपंच शोभा मोरे या होत्या. तर ग्राम विकास अधिकारी डी. बी. काळे, उपसरपंच नसरूल्लाह काकड यांची प्रमुख उपस्थितीत होती. ग्राम विकास अधिकारी काळे यांनी मागील ग्रामसभेचा वृत्तांत वाचवून दाखविला.
नवीन कृती आराखडाचे वाचन केले. या वेळी एमआरईजीएस अंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी आलेल्या कृती आराखडा संदर्भात माहिती दिली. तसेच महात्मा जोतिबा फुले व्यापारी संकुलचा दुसऱ्या मजल्याचे बांधकाम करणे एमआरईजीएस अंतर्गत पाणंद रस्ते करणे शेतकऱ्यांसाठी फळबाग योजना राबवणे आदी विषयांवर चर्चा होऊन त्यांना मंजूरी देण्यात आली. पंतप्रधान घरकुल योजने अंतर्गत ज्यांना घरकुल मंजूर झाले आहेत. त्यांनी तात्काळ कागदपत्रे ग्रामपंचायत मध्ये दाखल करण्याच्या सूचना दिल्या. येत्या सोमवार पर्यंत सर्व लाभार्थींनी आपले कागदपत्रे दाखल करावेत, नसता त्याच्या खालच्या लाभार्थ्यांचा विचार केला जाईल, असे ग्राम विकास अधिकारी काळे यांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.