आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना नगर पालिकेतंर्गत शहरात विविध प्रकारचा कर थकला आहे. मालमत्ता कर थकवणाऱ्यांमध्ये अनेक मोठ्या लोकांचा समावेश असल्याची यादीच पालिकेच्या वसुली पथकाकडे आहे. कर वसुलीसाठी नगर पालिकेकडून विविध प्रकारची कारवाई केल्या जात आहे. कर वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट गाठण्यासाठी थकबाकीदारांच्या मालमत्तांची जप्तीही सुरू केली आहे. दरम्यान, अगोदर नोटिसा दिल्या, नंतर मालमत्ता जप्त केल्या जात आहेत. पाणी कट करण्याचीही कारवाई प्रस्तावित आहे. दरम्यान शुक्रवारी पुन्हा सहा मालमत्ता सील करुन जप्त करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ४२ मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. मार्च एंडमुळे कर विभागाच्या पथकांकडून कर थकवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे. ज्या मालमत्ताधारकांनी कर थकवला आहे, त्यांना यापूर्वीच नोटिसा देऊन कर भरण्याचे आवाहन केले आहे. यानंतरही अनेक जण कर थकवत आहेत.
यामुळे पहिल्या टप्प्यात अनेक वर्षांपासून कर थकवणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. नोटिसा देऊनही कर थकवत असल्यामुळे मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. जालना शहरातील गांधी नगर, चंदनझीरा, सुंदरनगर, बुऱ्हाननगर, कानडी वस्ती, रामनगर, लोधीमोहल्ला, रामनगर, कानडी वस्ती, विणकर मोहल्ला, संभाजीनगर काही भाग, अर्जून नगर, मंगळ बाजार परिसर, पॉवरलुम परिसर, कन्हैयानगर, दु:खीनगर परिसर, नुतन, अंबड रोड आदी भागांमध्ये सर्वाधिक थकबाकी असल्याची माहिती कर विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, शुक्रवारी रंगुलाल हिम्मतलाल, गजानन सुधाकर मगर, नटराज टाकी, पद्माकर चंफतराव जोशी, माणिक दिवकर बनकर यांच्या मालमत्ता सील केल्या आहेत. ही कारवाई मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महेश शिंदे, केशव कानपुडे, प्रविण डिघोळे, प्रभाकर बोर्डे, नीलेश शंकरपल्ली, बी. आर. गवळी आदींनी या कारवाया केल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.