आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाला अपयश:अवैधरीत्या गर्भपात करणाऱ्या बोगस डॉक्टरसह 5 जणांचा सुगावा लागेना; िघांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ

जालना19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील ढवळेश्वर भागातील राजुरेश्वर क्लिनीकवर आरोग्य व पोलिसांच्या पथकाने छापा टाकून अवैध गर्भपाताचे प्रकरण शुक्रवारी उघडकीस आणले. मात्र, चार दिवस उलटूनही यातील मुख्य आरोपीसह इतर पाचजण फरार आहेत. यामुळे पुढील तपासासाठी पोलिसांच्या विनंतीवरून अटकेतील तिघांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली आहे. राजु भानुदास पवार, सुनिता सुभाष ससाणे, कौशल्या नारायण मगरे (सर्व रा. चंदनझिरा, जालना) अशी पोलिस कोठडीतील आरोपींची नावे असून मुख्य आरोपी डॉ. सतीष बाळासाहेब गवारे, पुजा विनोद गवारे (दोघे रा. ढवळेश्वर), एजंट संदीप गोरे, डॉ. प्रिती मोरे (रामनगर, साखर कारखाना) व स्वाती गणेश पाटेकर (ढवळेश्वर, जालना) हे फरार आहेत. दरम्यान, तीन दिवसांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने अटकेतील राजु पवार, सुनिता ससाणे, कौशल्या मगरे यांना चंदनझिरा पोलिसांनी सोमवारी दुपारी ३.३० वाजता दिवाणी न्यायाधीश क स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायाधीश (दुसरे) न्या. एन. ए. वानखेडे यांच्यासमोर उभे केले.

यावेळी आरोपींकडून जप्ती मिळाली असून फरार आरोपींबद्दल त्यांना काहीही माहिती नाही. यामुळे पोलिस कोठडीची गरज नसून न्यायालयीन कोठडीत पाठवावे, अशी विनंती आरोपींचे वकील अॅड. एस. एल. बोर्डे व त्यांच्या सहकाऱ्याने केली. तर तपास अधिकारी आर. के. नाचण म्हणाले, या आरोपींकडून एक मोबाईल व गर्भपाताच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. त्यांना फरार आरोपींची माहिती आहे. मात्र ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. यामुळे फरार आरोपींचा शोध, सोनोग्राफी मशिन जप्त करण्यासह या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का याच्या तपासकामी आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी नाचण यांनी केली. तर सरकारतर्फे अॅड. वृंदा सदगुरे यांनीही अटकेतील आरोपींचा यात सक्रीय सहभाग असून ते मुख्य आरोपीला मदत करत होते, याचा त्यांना माेबदलाही मिळत होता.

बातम्या आणखी आहेत...