आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील आदर्श कॉलनीतील जयभद्रा नगरात राहणाऱ्या एका ३८ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करत घरातील रोख रकमेसह ६ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एका राष्ट्रीय पक्षाच्या तालुकाध्यक्षासह इतर ७ ज्ञात आरोपी आणि ३० ते ३५ अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील प्रकार पैशाच्या देवाण -घेवाणीतून घडला आहे. ३८ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी सदरील महिला आपल्या घरात असताना, तिच्या ओळखीच्या असणाऱ्या संदीप गायकवाड, आकाश जाधव, रमेश भापकर, शिवा पाईकराव, विठ्ठल भापकर, आकाश शिवदास शिंदे, मनिष प्रितम भवरे यांनी हातात चाकू, तलवार घेऊन अचानक घरात प्रवेश केला. घरातील सामानाची तोडफोड करून नुकसान केले. सामान घराबाहेर फेकून दिले.
त्यांच्यासोबत असणाऱ्या अनोळखी २० ते ३० महिला पुरुषांनी देखील घरातील सामानाची तोडफोड करून सामान घराबाहेर फेकले. रमेश भापकर आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर दोन अनोळखी व्यक्तींनी रूममध्ये येऊन, घराचे राहिलेले पैसे केव्हा देणार असे म्हणत महिलेची छेड काढत विनयभंग केला. घरातील ४० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन, कपाटातील रोख पाच लाख ३३ हजार रुपये आणि सोन्याचे दागिने असा एकूण ६ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने लांबवला.
याप्रकरणी संदीप गायकवाड, आकाश जाधव, रमेश भापकर, शिवा पाईकराव, विठ्ठल भापकर, आकाश शिंदे, मनिष भवरे आणि इतर अनोळखी २० ते ३० महिला व पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणचा तपास पोलिस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे हे करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.