आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा रेल्वे उभी असताना, जात असताना, कुणी खिडकीत उभे राहून बोलत असतांना हातचलाखीने रेल्वे प्रवासात दररोज शेकडो जणांचे मोबाईल चोरीस जात आहेत. अडीच महिन्यांमध्ये राज्यात ६ हजार १४४ मोबाईल चोरीस गेले आहे. सर्वाधिक मोबाईल चोरी मुंबई विभागात आहे. चोरीस गेलेल्या मोबाईलपैकी महिन्याला ३० ते ४० टक्के मोबाईलचा पोलिसांना तपास लागत आहे. पोलिसांनी चोरीस गेलेल्या मोबाईलचे ट्रेस केले असता, अनेक मोबाईल हे उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये दाखवित असल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून देण्यात आली आहे. सर्वाधिक मोबाईल चोऱ्या मुंबई विभागात होत आहे. रेल्वे प्रवासातून मोबाइल चोरीस जाण्याच्या घटना मागील काही महिन्यांपासून वारंवार घडत आहेत. रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची सुरक्षा हे लोहमार्ग पोलिसांचे मुख्य कर्तव्य आहे. रेल्वेत प्रवास करणारे प्रवासी आणि पोलिसांमध्ये सुसंवाद राहण्यासाठी प्रत्येक रेल्वेत काही रेल्वे पोलिसही नियुक्त असतात. परंतु, हे पोलिस प्रत्येक प्रवाशाजवळ जाणे शक्य होत नाही. चोरटे गर्दीचा फायदा घेऊन किंवा प्रवासी झोपेत असताना चोऱ्या करीत आहेत. राज्यातील कोकण, छत्रपती संभाजी नगर, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती या विविध विभागातील रेल्वे पटर्याहून मोबाईल चोरीस जात आहेत. अडीच महिन्यांत मोबाइल चोरी अडीच महिन्यांत रेल्वे विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार मुंबई ३६४३, छत्रपती संभाजी नगर १३०७, नागपूर ५६१, पुणे २६१ असे मोबाईल चोरी गेले आहेत.
प्रवासात मोबाइल चोरी } प्रवासात सतर्कता बाळगा रेल्वे प्रवासात प्रवाशांनी सतर्क राहावे. मोबाईल वरच्या खिशात न ठेवता ते खालच्या खिशात ठेवावे, चोरीस गेलेले मोबाईल गुन्हा दाखल झाल्यानंतर ट्रेससाठी ठेवले जातात. तपासाचे प्रमाण ३० ते ४० टक्के आहे. -गणेश दळवी, पोलिस निरीक्षक, रेल्वे पोलिस, औरंगाबाद.
चोऱ्यांचे प्रमाण मुंबई विभागात अधिक पोलिस चोरीस गेलेला फोन असा करतात ट्रेस रेल्वे प्रवासात मोबाईल चोरीस गेल्यानंतर गुन्हे दाखल होतात. यानंतर संबंधित पोलिस एसपींच्या आदेशाने सदरील मोबाईलचे आयएमईआय क्रमांक सीमकार्ड कंपन्यांना दिले जातात. त्या मोबाईलमध्ये सीम टाकल्यानंतर त्या मोबाईलचे लोकेशन संबंधित सिमकार्ड कंपन्याना मिळते. तो रिपोर्ट पोलिसांना येतो. यानंतर पोलिस आरोपींना शोधतात. अनेक मोबाईल परराज्यात ट्रेस होतात. यामुळे हे मोबाईल शोधतांना अडचणी येतात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.