आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:रोहनवाडी रोडवर बारा लाख रुपयांचा 62 किलो गांजा जप्त ; गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दहशतवाद विरोधी पथक व स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत १२ लाख ६४ हजार रुपयांचा ६२ किलो गांजा जप्त करण्यात आला. जालना शहरापासून जवळच असलेल्या रोहनवाडी रोडवर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांना माहिती मिळाली होती. यात स्विफ्ट डिझायर कार एमएच १४ सीएक्स ९२९९ मधून काही व्यक्ती गांजा विक्रीसाठी घेऊन येत असल्याचे सांगितले. पथकाने कुंडलिका नदीत रोहनवाडी पुलावजळ सापळा लावला. त्याचवेळी संबंधित कार तेथे आली असता पथकाने ती अडवली. कारमध्ये पाहणी केली असता, त्यात तब्बल ६२ किलो गांजा आढळून आला. चालक महादेव जालिंदर हरकळ (२८, दिंद्रुड, ता. माजलगाव, जि. बीड), इक्बाल अहेमद शफी अहेमद (३४, नूतन वसाहत, जालना) आणि गणेश मेंडके (३४, दिंद्रुड, ता. माजलगाव) या तिघांना पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून १२ लाख ६४ हजार रुपये किमतीचा गांजा, ५ लाख ५० हजार रुपये किमतीची कार आणि दीड हजार रुपये रोख असा जवळपास १८ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तिघांविरुद्ध पोलिस कॉन्स्टेबल राजेश घुगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरिक्षक सुभाष भुजंग, सहायक पोलिस निरीक्षक योगेश धाेंडे, उपनिरीक्षक राहुल पाटील, यासीन शेख, अंकुश राठोड, राजेश घुगे, दिनेश बर्डे, रशिद शेख, कैलास कुरेवाड, ए. बी. अडियाल, आर. डी. रंगे, रामेश्वर जाधव, अंबादास साबळे, लक्ष्मीकांत आडेप, फुलचंद हजारे, गोकुळसिंग कायटे, रुस्तुम जैवाळ, रंजित वैराळ, प्रशांत लोखंडे, गणेश वाघ, मनोज कांबळे आदींनी ही
कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...