आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट:प्राणिशास्त्र प्रदर्शनास 635 विद्यार्थ्यांची भेट

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जेईएस महाविद्यालयाच्या प्रणिशास्त्र विभागातर्फे आठवी ते दहावी या शालेय विद्यार्थ्यांकरीता प्रदर्शन ठेवण्यात आले होते. यामध्ये मासे, प्राणी पक्षी त्यांची उत्क्रांती आदी विषयावर सादरीकरण पाहायला मिळाले. या प्रदर्शनात अकरा शाळा व आरपीटीएसचे विद्यार्थी मिळून एकूण ६३५ विद्यार्थ्यांनी भेट दिली.

उद्घाटन माजी प्राचार्य डॉ. जवाहर काबरा, प्रभारी प्राचार्य डॉ. एन. वाय. गोरे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, प्राणिशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. ममता गोयल, डॉ. गणेश फलके आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रदर्शनात बीएससी च्या ३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत त्यांचे सादरीकरण केले. स्वयंसेवक म्हणून दहा विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास मदत केली. विशेष म्हणजे या प्रदर्शनात आरपीटीएसचे १०० प्रशिक्षणार्थीनी भेट दिली.

यावेळी त्यांना वन्यजीव व त्यांचे शाश्वत विकासातील महत्त्व या विषयावर संवाद करण्यात आला. या प्रदर्शनाचे संयोजन डॉ. ममता गोयल, डॉ. गणेश फलके आणि अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बीएससीच्या विद्यार्थ्यांनी केले. या प्रदर्शनात त्यांचे पोस्टर व सादरीकरणातून प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक काढून त्यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम पारितोषक म्हणून देण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. वितरण डॉ. एन वाय गोरे, प्रा. श्रीनिवास, डॉ. फलके, डॉ. गोयल यांच्या हस्ते करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...