आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवलिंग:66 राजस्थानी महिलांनी शहरात केली सामूहिक शिवलिंगार्चन पूजा

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात जिल्हा माहेश्वरी महिला संगठण, माहेश्वरी महिला मंडळ, माहेश्वरी महिला प्रगती समितीच्या वतीने सामूहिक पार्थिव सहस्र शिव लिंगार्चन पूजन महेश भवन येथे करण्यात आले. यात ६६ राजस्थानी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यामुळे अवघे वातावरण शिवमय बनले होते.

प्रधान आचार्य पंडित नागेश गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली व पंडित मनोज महाराज गौड यांच्या शुभाशीर्वादाने सदरील कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माहेश्वरी समाजाचे पदाधिकारी किशन भक्कड, विजय राठी, मंगल भंडारी, निर्मला साबू, सरोज करवा, मंगल मालपानी, अनिता राठी, शीतल मंत्री, अर्चना चेचाणी, सरिता बजाज, चंद्रकला भक्कड आदी महिलांनी सहभाग नोंदवला. शिवलिंगार्चन पूजेचे पौरोहित्य पंडित नागेश गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल गुरूजी, गजानन जोशी, विशाल त्रिवेदी, वृषभ बाजपेयी, दिनेश जोशी, बाळासाहेब भाले, अर्जुन गुरूजी यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...