आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलीओ ग्रस्त, अपघातात अवयव गमावलेल्या दिव्यांगांसाठी अग्रशक्ती बहु मंडळातर्फे नारायण सेवा संस्थान उदयपूर यांच्या सहकार्याने मंगळवारी आयोजित दिव्यांग तपासणी व कृत्रिम अवयव प्रत्यारोपण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शिबीरात १२० रुग्णांची तपासणी करण्यात आली. ७० जणांचे कृत्रिम हात-पाय, ११ दिव्यांगांना रॉड कुट साठी मोजमाप घेऊन चार पोलिओग्रस्तांची शस्त्रक्रियेसाठी निवड झाली. छञपती संभाजी महाराज नगर परिसरातील हॉटेल बगडिया इंटरनॅशनल येथे सकाळी उद्योजक पन्नालाल बगडिया यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.
या वेळी नीता बगडिया, डॉ. प्रकाश सिगेदार, आदित्य बगडिया, नारायण सेवा संस्थान उदयपूरचे समन्वयक डॉ. रोली शुक्ला,संदीप गिंदोडिया, मंडळाच्या अध्यक्षा आयुषी बगडिया, सचिव शीतल अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. पन्नालाल बगडिया यांनी गरजवंतांना आधार देणाऱ्या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. डॉ. प्रकाश सिगेदार यांनी दरवर्षी २० % नागरिक अपघात व अन्य कारणांमुळे अवयव गमावतात असे सांगितले. सुञसंचालन मार्गदर्शक सारिका तालुका यांनी केले तर सचिव शीतल अग्रवाल यांनी आभार मानले.
दुपारी ४ वाजेपर्यंत चाललेल्या शिबिरात जालना जिल्ह्यासह बुलडाणा जिल्ह्यातील दिव्यांगांनी सहभाग घेतला. नारायण सेवा संस्थानचे शिबिर प्रभारी डॉ. अखिलेश अग्निहोत्री , डॉ. उदय सिंग, डॉ. महेंद्र सिंग, डॉ. चून्नीलाल मीना, डॉ. महेश बैरागी, डॉ. सुनील श्रीवास्तव, व सहकार्यांनी दिव्यांगांची तपासणी करून उपचार तसेच मोजमाप केले. या वेळी रिता अग्रवाल, कोषाध्यक्षा स्नेहा भारूका, सहसचिव मेघा बगडिया, प्रकल्प प्रमुख प्रिती मल्लावत, ममता गुप्ता, संध्या अग्रवाल, सपना अग्रवाल, नम्रता पित्ती, सुचिता बगडिया, रचना पित्ती, आरती पित्ती , अर्चना अग्रवाल, पूजा अग्रवाल, डॉ. भारती अग्रवाल, पूनम अग्रवाल, शिखा अग्रवाल यांच्या सह दिव्यांगांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.