आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

32 ग्रा.पं.साठी 582 उमेदवार:सरपंचपदासाठी 72, तर सदस्यांसाठी 196 उमेदवारी अर्ज मागे

देहेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यामध्ये ३२ ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी असलेल्या ७२ तर सदस्य पदासाठी असलेल्या १९६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. आता रिंगणामध्ये असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे. जे सरपंच तसेच सदस्य बिनविरोध झाले, त्याबाबत अधिकृत शासनाकडून घोषणा केली जाणार आहे.

भोकरदन तालुक्यामध्ये ३२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकीमधील अर्ज मागे घेण्याची मुदत होती. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्यात आले. त्यानंतर रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. तालुक्यामध्ये सरपंच पदासाठी १५५ उमेदवारी अर्ज झाले होते. छाननीत १ अर्ज बाद झाला होता. त्यापैकी ७२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. आता रिंगणामध्ये ८२ उमेदवार आहेत.

सदस्यपदासाठी ७०१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत ४ अर्ज बाद झाला होता.त्यापैकी १९६ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. आता रिंगणात ५०० उमेदवार असणार आहेत. अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीचे बरेच चित्र स्पष्ट झाले असून यामध्ये सरपंच किती बिनविरोध असणार? तसेच कुठचे? किती ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या? हे शासन स्तरावरून जाहीर केले जाणार आहे. याबाबत अधिकृत माहिती दिली जाईल, असे नायब तहसीलदार बालाजी पोपलवाड दिली. दरम्यान, भोकरदन तालुक्यात सरपंच पदासाठी ८२ तर सदस्य पदासाठी ५०० उमेदवार रिंगणात आहेत. आज नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या दिवशी सरपंच पदासाठी एकूण १५४ वैध अर्जांपैकी ७२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले तर सदस्य पदासाठीच्या ६९६ वैध अर्जांपैकी १९६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.

बातम्या आणखी आहेत...