आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:72 हजारांची दारु चोरी; अट्टल गुन्हेगारास अटक ; एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चिंचोली येथील सागर बिअर शॉपी फोडून चोरट्यांनी ७२ हजार ८४० हजार रुपयांच्या मद्याच्या बाटल्या चोरुन नेल्याची घटना तीन मे रोजी रात्री घडली होती. यातील संशयित आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी अटक केली. दिनकर उर्फ पिन्या रोहिदास चव्हाण (वय २२, रा. सुप्रीम कॉलनी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. दिनकर याने सागर वासुदेव लाड (वय २४) यांच्या मालकीची बिअर शॉपी फोडून विविध प्रकारच्या मद्याच्या बाटल्या लांबवल्या. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, ही चोरी दिनकर याने केल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली होती. त्यानुसार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, चेजन सोनवणे, मुकेश पाटील, नाना तायडे, सचिन पाटील यांच्या पथकाने बुधवारी दुपारी दिनकरला सुप्रीम कॉलनी परिसरातून अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आत्तापर्यंत १७ गुन्हे दिनकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध जबरी लूट, दरोडा, चोरी, घरफोडी, मारहाण असे १७ गंभीर गुन्हे दाखल आहे. अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

बातम्या आणखी आहेत...