आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सहायक प्राध्यापकांच्या ७३ जागा भरण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने त्यासाठी मंजुरी दिली आहे. प्रत्येक विभागाला पूर्णवेळ सहायक प्राध्यापक मिळाले तर तासिका सुरळीत होतील. त्यादृष्टीने विद्यापीठ प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यासाठी प्रस्ताव मागासवर्ग कक्षाकडे (मावक) पाठवला आहे. ३ महिन्यांतच ही प्रक्रीया पूर्ण होईल. विद्यापीठात विविध विषयांच्या २८९ जागा मंजूर आहेत. पैकी १५२ जागा भरलेल्या आहेत. अद्याप १३६ जागा रिक्त आहे. पण २०१७ पासून भरती प्रक्रियेवर राज्य सरकारने निर्बंध आणले होते.
अनेक पाठपुराव्यानंतर मंजूर पदांपैकी ६० टक्के सहायक प्राध्यापकांची पदे भरण्यास मान्यता दिली होती. त्यामुळे ७३ जागा भरण्याचा निर्णय झाला आहे. आता पूर्णवेळ ७३ शिक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पद भरतीची जाहिरात मात्र अद्याप काढण्यात आली नाही. आता मावककडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच जाहीरात प्रसिद्ध केली जाणार आहे. पद भरती आता संवर्ग आरक्षणानुसार केली जाईल. सुधारित आकृतिबंधही निश्चित केलेला नाही. त्यासाठी काम सुरू आहे. कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सर्व विभागांचे काम सुरळीत चालावे, मनुष्यबळाची उपलब्धता व्हावी यादृष्टीने सहाय्यक प्राध्यापकांच्या जागा भरण्याचे नियोजन करून प्रस्ताव मावककडे पाठवला आहे. पुढील ३ महिन्यांत तातडीने भरती केली जाईल, असे कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.