आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रघोष:75  स्वातंत्र्यसैनिक करणार आझाद मैदानावर आंदोलन

जालना21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील ७५ स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे नामनिर्देशित पाल्य व वारस मुले हे विविध मागण्यांसाठी १२ सप्टेंबरपासून मुंबई मंत्रालयासमोरील आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याची माहिती स्वातंत्र्यसैनिक पाल्य समितीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब कोलते यांनी दिली आहे.विविध मागण्यांसाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ १२ सप्टेंबरपासून आझाद मैदान मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैनिक व उत्तराधिकारी यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई येथील हुतात्मा चौकापासून आझाद मैदान व तेथून मंत्रालयापर्यंत पायी चालत राष्ट्रघोष करणार आहे.

तसेच मंत्रालयातील तिरंग्याला मानवंदना देणार आहेत. जोपर्यंत स्वातंत्र्यसैनिकांच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असून या आंदोलनात जालना जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक व स्वातंत्र्यसैनिक पाल्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वातंत्र्यसैनिक पाल्य समिती चढे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब कोलते, भाऊसाहेब सोळुंके, अप्पासाहेब शिंदे, जवाहरलाल सारडा, शीला उंबरे, भगवानराव देशमुख, एकनाथराव इंगळे, दत्तू मिसाळ, रामचंद्र पिले, करू वाडेकर, ॲड. उज्ज्वला भोपळे, कडूबा कोलते, धनंजय चांदोडकर, सुधाकर शेळके, दादाभाई ढगे, मारुती जाधव, रामकिशन कदम, प्रशांत रुईकर, नवनाथ बावणे, धर्मेंद्र भोपळे, राहुल सूर्यवंशी, किरण पवार, सुभाष वाकेकर, शरद बेडमधे, बाळासाहेब चौंधे, महे सारणी आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...