आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षवल्ली आम्हा सोयरे:मान्यवरांसह ७५ विद्यार्थ्यांनी लावले प्रत्येकी एक झाड; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वृक्षारोपण

जालना6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यानिमित्ताने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना आणि लक्ष्मी कॉटस्पीन लिमिटेड, सामनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी कॉटस्पीन लिमिटेड यांच्या आवारात कौशल्य प्रशिक्षणार्थींच्या साहाय्याने ७५ रोपटी लावली.

या प्रसंगी सहायक आयुक्त संपत चाटे यांनी म्हणाले, निर्सगावर मोठ्या प्रमाणात केलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे जागतिक तापमानवाढ, दुष्काळ, अतिवृष्टी या सारख्या नैसर्गिक आपत्तींना वारंवार सर्व जगास सामोरे जावे लागत आहे. वृक्षारोपण करण्यात आलेल्या वृक्षांचे जतन व संवर्धन करणेसाठी सामाजिक बांधीलकी समजून प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांने एका वृक्षाचे संगोपन करण्याची जबाबदारी घ्यावी. असे आवाहन केले. यावेळी कार्यकारी संजय राठी उपस्थित होते.

प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना मोफत टि-शर्ट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. एस. आर. जवळकर यांनी केले. कार्यक्रमासाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे सुरेश बहुरे, कैलास काळे, आत्‍माराम दळवी, प्रदीप डोळे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...