आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:स्वगृही परतणार मराठवाड्यातील 763 शिक्षक, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया, सोमवारी धडकले बदलीचे आदेश; यंदा ३३% बदल्या

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामविकास विभागामार्फत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सोमवारी उशिरा पार पडली. स्वत:च्या जिल्ह्यात बदली मिळावी म्हणून शिक्षकांनी अर्ज केले होते. ऑनलाइन प्रक्रिया झाल्यानंतर राज्यात सर्वाधिक ३३.२१ टक्के बदल्या पार पडल्या. याअंतर्गत अनेक वर्षांपासून स्वजिल्ह्यात जाण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या ७६३ शिक्षकांना आपल्या जिल्ह्यातच कर्तव्य बजावता येणार आहे. बदलीत आरोग्य समस्या तसेच पती-पत्नी एकत्रिकरणाला ३० टक्के प्राधान्य देण्यात आले आहे.

पती-पत्नी एकत्रिकरण, वृद्ध व आजारी आईवडील आदी कारणाने स्वजिल्ह्यामध्ये बदली करून घेण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न चालू असतात. २०१७ पासून ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदली प्रक्रिया ह्या ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबत आदेश दिले होते. यानुसार राज्यात जिल्हा बदलून जाणाऱ्या शिक्षकांसाठी आंतर जिल्हा बदली प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबवली गेली. या आंतर जिल्हा बदलीमध्ये आतापर्यंत चार टप्पे प्रक्रिया पूर्ण झाली. पाचव्या टप्प्यांमध्ये मराठवाड्यातील ७६३ शिक्षक हे अंतर जिल्हा बदलीने स्वगृही गेले आहेत. या वर्षांत जिल्हा बदलीमध्ये प्रथमच जिल्हाअंतर्गत बदली प्रमाणे संवर्ग एक, संवर्ग दोन असा प्राधान्यक्रम लावला गेला नाही गंभीर स्वरूपाचे आजार असलेल्या कर्मचारी वा त्यांच्या कुटुंबीयांत मुलगा पत्नी गंभीर स्वरूपाच्या आजार असतील तर संवर्ग एक प्रमाणे त्यांना बदलीमध्ये प्राधान्य दिला गेला. तसेच पती-पत्नी एकत्र करण्यामध्ये संवर्गाला प्राधान्य दिले आहे. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये ३४ जिल्हा परिषद मधुन ३ हजार ९४३ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक बदली संख्या आहे.

राज्यात १५,९९६ आजपर्यंत शिक्षकांच्या केल्या बदल्या २०२०, २०१९, २०१८ व २०१७ या चार टप्प्यात एकूण १२ हजार ५३ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. तर २०२२ मध्ये ३,९४३ मिळून आजपर्यंत १५ हजार ९९६ शिक्षकांच्या ऑनलाइन आंतरजिल्हा बदल्या पूर्ण झाल्या. मागील ८ ते १० वर्षांपासून शिक्षक स्वत:च्या जिल्ह्यात बदलीसाठी प्रतिक्षेत होते.

जिल्हा बदली झालेले शिक्षक जालना १८९ बीड १०२ औरंगाबाद १७० उस्मानाबाद ३५ परभणी ८४ हिंगोली ९१ नांदेड ७४ लातूर १८

दोन वर्षांनंतर बदली प्रक्रिया मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आंतरजिल्हा बदली टप्पा ५ यशस्वीपणे राबवला गेला आहे. आता लवकरच जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया होणे अपेक्षित आहेत. यावर्षी झालेल्या सर्वाधिक बदल्याचे हे प्रमाण असून अनेक शिक्षकांना स्वगृही जाण्याची सुविधा मिळाली आहे. - संतोष राजगुरू, राज्याध्यक्ष, प्रहार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना.

बातम्या आणखी आहेत...