आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:बनावट कागदपत्रे, डेबिट कार्ड पाठवून 79 हजार घेतले काढून

जालना8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयसीआय बँकेची बनावट कागदपत्रे व डेबिट कार्ड पाठवून विश्वास संपादन करून ओटीपी घेऊन ७९ हजार रुपये बँकेतून परस्पर ट्रान्सफर करून घेतल्याची घटना अंबड येथे घडली आहे. याप्रकरणी चंद्रकांत देविदास सबणीस (७०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात ८९५६६९४६८४ या मोबाइल नंबर वापरकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दररोज कुणाची ना कुणाची फसवणूक केली जात आहे. मोबाइलवर आलेला ओटीपी कुणालाही सांगू नका, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, गुन्हेगार वेगवेगळे मार्ग अवलंबून नागरिकांना फसवित आहेत. दरम्यान, सबनीस यांच्या घरी आयसीआय बँकेची कागदपत्रे पाठवून विश्वासात घेऊन खात्यातून ७९ हजार रुपये काढून घेतले आहेत. याप्रकरणी सायबर पोलिस तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...