आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात ग्रामपंचातीची निवडणुकीतील ३९ सरपंच आणि ३०५ सदस्यांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. रविवारी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत ३३ टक्के मतदान झाले होते तर दुपारी दीड वाजेला ५७ टक्के मतदान झाले होते. साडेतीन वाजेपर्यंत ७१ टक्के एवढे मतदान झाले आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ८४.४५ टक्के मतदान झाले. सरपंच पदाकरिता ११९, तर सदस्यांसाठी ७७५ उमेदवार रिंगणात होते. ५८ हजार ६०० मतदारांपैकी अंबड तालुक्यातील १२६ मतदान केंद्रावर ६२० प्रभागात ४९ हजार ४९० एवढ्या मतदारांनी मतदान केले.
निवडणूक प्रक्रियेचे काम रात्री उशिरापर्यंत तहसीलदार गौरव खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते. या सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आ. मंगळवारी सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार असून मतदारास उमेदवारांना निकालाची उत्सुकता लागली आहे. निवडणुकीत उभे असलेल्या दोन्हीकडील उमेदवारांनी आम्हीच निवडून येणार असल्याचे दावा केला आहे. यामध्ये धनगर पिंपरी, चिंचखेड, जामखेड, मार्डी, पागीरवाडी, डोमेगाव, हस्तपोखरी, अंतरवाली सराटी, नालेवाडी, भांबेरी, झिरपी, वडी लासुरा, पानेगाव या ग्रामपंचायतीत चुरशीची लढत झाली. दरम्यान, काही ग्रामपंचायतमध्ये दोन गटात बाचाबाची झाल्याच्या घटना घडल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.