आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना:रुग्णालयातून पळालेल्या 9 कोरोना संशयितांना पकडले; जालन्यात सारीमुळे दोन महिलांची प्रकृती गंभीर

जालना3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पळून गेलेल्या संशयितांना 12 तासांतच पोलिसांनी शोधून काढले

येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी सायंकाळी प्रशासनाने संशयित म्हणून भरती केलेल्या ९ जणांनी रुग्णालयातून पळ काढला होता. मात्र पुन्हा त्यांना १२ तासांतच पोलिसांनी शोधून काढले. 

मुंबईहून आलेल्या नातेवाइकांच्या संपर्कात आलेल्या या  संशयितांना रुग्णालयात भरती केले होते, परंतु शनिवारी रात्री त्यांनी पळ काढला. रविवारी त्यांचे स्वॅब घेऊन नमुने पाठवायचे होते. रविवारी सायंकाळी सात जणांना पकडून रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघे अंबडच्या रुग्णालयात आहेत. शहरातील दु:खीनगरातील एक ६५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह अाहे. हा भाग सील असून आरोग्य पथकाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. ड्रोनद्वारे पाहणीही सुरू आहे.

जालन्यात सारीमुळे दोन महिलांची प्रकृती गंभीर

जालन्यात दोन महिलांना सारीची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. के. राठोड यांनी दिली. या दोघींवर कोराेना संशयित विलगीकरण कक्षात उपचार सुरू होते. मात्र, त्यांना अहवाल निगेटिव्ह आला.

बातम्या आणखी आहेत...