आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:विद्यापीठाच्या अधिसभेसाठी झाले 98 टक्के मतदान

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळांच्या निवडणुकीसाठी चार जिल्ह्यातील १७ केंद्रांवर शनिवारी मतदान झाले. चार जिल्ह्यांतील ४,२०५ मतदार होते. पैकी ९८ टक्के म्हणजेच ४०८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

यात ८९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. १३ डिसेंबरला बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणी होईल. त्याचा कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी आढावा घेतला. या वेळी डॉ. साखळे, डॉ. सतीश पाटील, डॉ. राम चव्हाण आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...