आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:महाकाळ्यात 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या

वडीगोद्री2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाकाळा (ता.अंबड) येथील २२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. तेजस कर्णराज चिमणे असे या घटनेतील मृताचे नाव आहे. तेजस चिमणे शुक्रवारी शेतात पाणी देण्यासाठी गेला होता.

मात्र, तो घरी परत न आल्याने शनिवारी नातेवाईक शेतात गेले. त्यावेळी महाकाळा शिवारातील अशोक चिमणेयांच्या शेतातील पत्राच्या शेडमध्ये अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत ताे दिसून आला. या घटनेची माहिती गोंदी पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन सदर मृतदेह शहागड येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या आत्महत्येचे घटनेमुळे परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...