आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहन:स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 75 फुटी रावणाचे होणार दहन

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर दशहरा महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यंदाही विजयादशमीच्या मुहूर्तावर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नयनरम्य आतषबाजीत ७५ फुटी रावण दहनाचा कार्यक्रम ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता आयोजित केला आहे. शहरातील जेईएस कॉलेज प्रांगणावर कार्यक्रम होईल. हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. दुष्कृत्यावर सत्कर्माची मात आणि वाईट प्रथांचा नाश करून चांगले गुण अंगी बाळगण्याचा संदेश देणारा दसरा हा सण आहे. समितीच्या वतीने रावण दहनाचा सोहळा चाळीस वर्षांपासून आयोजित करण्यात येतो. कोरोनाने ही परंपरा खंडित करावी लागली होती. हिंगोली येथील कोंडीराम भुसाने परिवार रावणाची प्रतिमा करण्यासाठी दहा दिवसांपासून कार्य करीत आहे. संगमनेर येथील येथील जमीर फायर वर्क्स यंदा नवीन प्रकारची आतषबाजी तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत.

नयनरम्य आतषबाजीचे यंदा खास आकर्षण
मल्टी कलरमध्ये बोंझा, क्रॅक्लिंग कोकोनट, सिल्व्हर स्नेक, चायना टेक्निक, सिल्व्हर ड्रम, गोल्डन बझुका, मॅजिक हिपहॉप, टायटॅनिक, टायटॅनिक ग्रीन, साऊंड ग्राउंड आयटममध्ये अम्ब्रेला शॉवर, स्टार व्हील, सिल्व्हर रेन, थ्री व्हील, क्रॅकलिंग नायगारा हॉट फॉल, कोकोनट ट्री, फाइव्ह ट्री व्हील, सनरीच, गोल्डन स्टार व्हील, गोल्डन ट्री व्हील, वेलकम नेमप्लेटमध्ये वेलकम या प्रकारची नयनरम्य आतषबाजी यंदाचे आकर्षण राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...