आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वालसावंगीत विद्यार्थ्यांनी तयार केली दिनदर्शिका

वालसावंगी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील बालाजी विद्यालयातील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षक विशाल गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विषयातील दिनदर्शिका या पाठाच्या आधारे स्वनिर्मित दिनदर्शिका तयार केल्या आहेत. नवीन दिनदर्शिकेस शाळेचे नाव ‘बालाजी दिनदर्शिका’ असे देण्यात आले. काही दिवसांतच वर्ष २०२२ संपून २०२३ वर्ष सुरू होत आहे. नवीन वर्ष लागताच ओढ लागते ती नवीन दिवसांची, नवीन संकल्पाची अन नव्या उमेदीची या आतुरतेनेच विद्यार्थ्यांनी आपल्या चिमुकल्या हातांनी दिनदर्शिका बनवल्या. बाजारात दिनदर्शिका खरेदी करण्यासाठी गर्दी असते.

मात्र बालाजी विद्यालयातील चिमुकल्यांनी अल्प दरात घरच्या घरी सुबक दिनदर्शिका तयार केल्या. विद्यार्थ्यांनी स्वतः दिनदर्शिका तयार केल्यामुळे त्यांना दिनदर्शिका कशी तयार होते. याचा परिपूर्ण अभ्यास झाला. दिनदर्शिका या पाठाच्या आधारे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना वर्ष, महिना, आठवडे दिवस याची ही माहिती व्हावी या उद्देशाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.

विद्यार्थ्यांना पाठाच्या आधारे उपक्रम राबवून त्यांच्यामध्ये शाळा शिक्षणाविषयी गोडी कशी निर्माण करता येईल. दिनदर्शिका तयार करण्यासाठी रंग पेन, रंगीत कागद अशा अल्प खर्चात दिनदर्शिका तयार करण्यात आल्या. यामध्ये प्रथम आराध्या वाघ, द्वितीय लावण्या कोथलकर, अंकिता अस्वार क्रमांक पटकावला. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कोथलकर, डॉ. अनिलकुमार लाठे, संजय कोथलकर, कैलास फुसे, योगेश घुले, विशाल गुजर, शरद वणारसे, अनंत बारोटे, पवनसिंग परदेशी, उगले, रोहित वाकोडे, प्रवीण उगले, अनिल खोलगडे यांच्यासह आदींनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...