आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी:कारची ऊस टायर गाडीला धडक; दोन ऊसतोड कामगार जखमी

वडीगोद्रीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव जाणाऱ्या कारने दोन ऊस टायर गाड्यांना मागून धडक दिल्याने दोन ऊसतोड कामगारासह तीन बैल जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान वडीगोद्री-जालना मार्गावरील धाकलगावाजवळ घडली.

कारखान्याहून ऊस टायर गाड्या खाली होऊन शहापूरकडे ऊस तोडणीसाठी जात असताना दोन ऊस टायर गाड्यांना येणाऱ्या कारने (एमएच २१ सी ३३८५) मागून धडक दिली. धडक एवढी जोरात होती की एक टायर गाडी रोडच्या खाली जाऊन पलटी झाली, तर दुसऱ्या टायर गाडीचे चाक तुटून टायर निघाले.

या धडकेत तीन बैल जखमी झाले असून ऊसतोड कामगार ज्ञानेश्वर धोंडिबा शिंदे (शहापूर, ता. अंबड), रामेश्वर कल्याण कापसे (दाढेगाव, ता. अंबड) हे दोघे जखमी झाले. कारमधील कुणालाही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे काही काळ महामार्गावर गर्दी झाली होती. या अपघातामुळे ऊसतोड कामगारांचे मोठे नुकसान झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...