आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटना:बैलाची जीभ कापून विषारी द्रव्य खाऊ घातल्याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात एका अज्ञातावर गुन्हा दाखल

सेलूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शिराळा येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये असलेल्या बैलास अज्ञात व्यक्तीने विषारी द्रव्य खालून खाऊ घालून जीभ कापल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना एक नोव्हेंबर रात्री घडली.पोलिसांनी दिलेली माहितीप्रमाणे घटनेच्या दिवशी एक ते दोन नोव्हेंबर दरम्यान शिराळा येथील केदारेश्वर शेजुळ या शेतकऱ्याच्या शेतामध्ये अज्ञाताने बैलास विषारी द्रव्य खाऊ घालून जीभ कापल्याची घटना दोन नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. ही शिराळा येथील जनावरांच्या बाबतीत घडलेली बारावी घटना आहे.

आतापर्यंत यासारख्या झालेल्या घटनेत शेतकऱ्यांच्या पशुधनाची जीभ कापण्याचा प्रकार घडला होता, ते ११ जनावरे तडफडून मरण पावली. २ नोव्हेंबर रोजी असाच प्रकार पुन्हा घडल्याने केदारेश्वर सुधाकर शेजुळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुध्द प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मधुकर जाधव करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...