आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतिम परीक्षा फीस:विद्यार्थ्याकडून लाच घेतल्याप्रकरणी संस्थाचालकासह दोघांवर गुन्हा दाखल

भोकरदन/धावडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बारावीची अंतिम परीक्षा फीस ४७५ रुपये असताना विद्यार्थ्याकडून १५०० रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणात संस्थाचालकासह प्राचार्य, कर्मचाऱ्याविरुद्ध पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी धावडा येथील डॉ. नसीम उर्दू ज्युनिअर कॉलेजमध्ये करण्यात आली.संस्थाध्यक्ष डॉ. नसीम अहमद खान इस्माईल खान, प्रभारी प्राचार्य शेख शोएब शेख मेहबूब व लॅब असिस्टंट पवन श्रीराम भोंबे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

धावडा येथील डॉ. नसीम उर्दू ज्युनिअर कॉलेजमधील एक विद्यार्थी १२ वीची अंतिम परीक्षा फी भरण्यासाठी गेला होता. त्या वेळी फी ४७५ असताना प्राचार्यांनी १५०० रुपये मागितले. त्याबाबत संस्थाचालकांना सांगितले असता त्यांनी प्राचार्यांना १५०० रुपये घ्यावे असे सांगितले. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याने जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

तक्रारीनुसार १२ व १४ ऑक्टोबर रोजी लाचेच्या मागणीबाबत पडताळणी करण्यात आली. त्यानंतर पथकाने मंगळवारी धावडा येथील महाविद्यालयात सापळा लावला. लॅब टेक्निशियन पवन भोंबे यांनी लाचेची मागणी करून ती स्वीकारताच कारवाई करण्यात आली. या प्रकरणात संस्थाध्यक्ष, प्राचार्यांसह लॅब टेक्निशियनविरुद्ध पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...