आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जड वाहतूक:जड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सावधानतेचा इशारा लावावा

माहोरा2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे रस्त्यावर जड मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सावधानतेचा इशारा लावण्याचे आवाहन पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन यांनी केले.

माहोरा मोठया बाजारपेठेचे गाव असून विदर्भ व मराठवाडा विभागाच्या सीमारेषेवरील मराठवाड्यातील मोठ्या रहदारी असते. माहोरा गावच्या परिसरात जवळच साखर कारखाना असून दररोज जवळपास मोठी बरीच जड वाहने ट्रक,ट्रॅक्टर वाहतुकीसाठी वापरतात त्यातच माहोरा परिसरात मिरची व इतर भाजीपाला पिके जास्त प्रमाणात माल वाहतूक होत असल्याने रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढण्याचा धोका लक्षात घेऊन प्रत्येक वाहन चालकाने आपली जबाबदारी व कर्तव्य यांचे भान ठेऊन वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज असल्याचे प्रल्हाद मदन यांनी म्हटले आहे.

वाहन जर रस्त्यात बंद पडले असेल तर तत्काळ कडेला लावून तेथे वाहन बंद पडले स्पष्ट दिसेल अशी सूचना लावणे. पायी चालणाऱ्या लोकांनी डाव्या बाजूस चालणे, मद्यप्राशन करून वाहन न चालवणे, रस्त्याला लागून किंवा रस्त्याच्या बाजूला अडचण येईल असे वाहन उभे न करणे,वाहन मर्यादित वेगाच्या बाहेर जोरात न चालवणे अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या सर्व वाहन चालकांनी पाळण्याचे आवाहन पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन यांनी केले. यावेळी प्रकाश पठाडे, गावंडे मेजर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...