आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शेतीच्या वेदनेचा वेद ‘हिरवा पांडुरंग’ हा कवितासंग्रह; कवी, स्तंभलेखक अरुण चव्हाळ यांचे प्रतिपादन

सेलू17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरडवाहू रान असताना काबाडकष्टाने आयुष्याच्याचाच गारा होणे म्हणजे अत्युच्च कष्टाची भाकरी असते. भाकरी जपताना आयुष्याचा निचरा होत असतो. फुललेल, फुलवलेल हिरवं रान शेतकऱ्याच्या जगण्याच सचेतन साज असतो. कवी प्रदीप ईक्कर यांचा पहिला कवितासंग्रह ‘ हिरवा पांडुरंग ‘ हा शेतीच्या कष्टाच्या वेदनेचा वेद आहे. असे प्रतिपादन कवी, स्तंभ लेखक अरुण चव्हाळ यांनी केले. सेलू नागरी पतसंस्थेच्या सहकार्याने शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कविता मिरगाच्या व प्रदिप ईक्कर यांच्या ‘ हिरवा पांडुरंग ‘ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजीवनी तडेगावकर, डॉ. केशव खटींग, डॉ. अशोक पाठक, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, कवी प्रा. चंद्रशेखर मलकमपट्टे, रवी केसकर, भाग्यश्री केसकर, प्रदीप देशमुख, अशोक काकडे, संतोष देशमुख, पंडित तडेगावकर यांची उपस्थिती होती. अरूण चव्हाळ म्हणाले, कवी ‘ मराठवाडी बोलीची ‘ अस्सलता जाणणारा असून तो खऱ्या अर्थाने मातीचा दास ही भूमिका जगतो. डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी या प्रसंगी कवी प्रदीप ईक्कर यांच्या ‘ वावराची खरेदी ‘ या कवितेचा आपल्या भाषणात संदर्भ दिला. त्या म्हणाल्या की, कविता बापाच्या तगमगीची आहे. वावर विकून लेकीचे लग्न करून देणारा व धायमोकलून रडणारा बाप हे कवितेचे बलस्थान आहे. तर कवी डॉ. केशव खटींग म्हणाले की, कविता हातात घेऊन कवीने जगले पाहिजे. कवीची कविता म्हणजे शेतातील ताजे पाणी आहे. प्रदीप देशमुख यांनीही या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या कार्यक्रमानंतर कविता मिरगाच्या हे कवीसंमेलन झाले. प्रास्ताविक शरद ठाकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. काशीनाथ पल्लेवाड यांनी तर माधव गव्हाणे यांनी आभार मानले. यावेळी सुरेश हिवाळे, पांडुरंग लाडाणे, रामराव गायकवाड, बाळू बुधवंत, अशोक उफाडे, सचिन विखे, माऊली सोळंके, दिपक साकळकर, चैतन्य खरात, विष्णू आंधळे आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...