आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:लेकीला भेटण्यासाठी जाताना कारच्या‎ धडकेत दगडवाडीचे दांपत्य जागीच ठार‎

खामगाव‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव गोरक्ष (ता. फुलंब्री) येथे‎ मुलीला भेटण्यासाठी येत असलेल्या‎ आई-वडिलांच्या दुचाकीला मागून‎ भरधाव क्रुझर कारने दिलेल्या जाेराच्या‎ धडकेत दांपत्य जागीच ठार झाले. ही‎ घटना छत्रपती संभाजीनगर -जळगाव‎ राष्ट्रीय महामार्गावरील खामगाव फाटा‎ येथे शनिवारी (११ मार्च) सकाळी नऊ‎ वाजेच्या सुमारास घडली. दत्तू वामन‎ बोराडे (६५), कमलबाई दत्तू बोराडे‎ (५९, रा.दगडवाडी, ता. भोकरदन,‎ जि.जालना) असे मृत दांपत्याचे नाव‎ आहे.‎ दगडवाडी येथील बाेराडे दांपत्य हे‎ छत्रपती संभाजीनगर येथे‎‎‎‎‎‎‎ वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी‎ दुचाकीने (एमएच १९/ ४०१) जात‎ हाेते. दरम्यान, मुलीचे गाव खामगाव‎ गाेरक्ष हे वाटेत असल्याने मुलीची भेट‎ घेऊन ते पुढे जाणार हाेते.

त्यामुळे‎ मुलीची भेट घेण्यासाठी त्यांनी छत्रपती‎ संभाजीनगर -जळगाव महामार्गावरील‎ खामगाव फाट्याकडे वळण घेत हाेते.‎ तेवढ्यात पाठीमागून भरधाव अालेल्या‎ क्रूझर कारने (क्र. एमएच १९ एपी‎ २९८८) त्यांच्या दुचाकीला जोराची‎ धडक दिली. यात दुचाकीस्वार दत्तू‎ बाेराडे व कमलबाई बाेराडे हे दांपत्य‎ गंभीर जखमी झाले. अपघात इतकी‎ भीषण हाेता की, दुचाकी ३० फुटांपर्यंत‎ फरफटत नेली. या अपघाताची माहिती‎ मिळताच वडोद बाजार पोलिसांनी‎ घटनास्थळी धाव घेतली.‎ अपघातातील दांपत्यास महात्मा फुले‎ रुग्णवाहिकेतून फुलंब्री येथील ग्रामीण‎ रुग्णालयात दाखल केले असता‎ डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.‎ दुपारी चार वाजेच्या सुमारास‎ दगडवाडी येथे शोकाकुल वातावरणात‎ त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात‎ आले. त्यांच्या पश्चात ७ मुली, १‎ मुलगा, भाऊ-भावजय, जावई,‎ नातवंडे असा मोठा परिवार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...