आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नादुरुस्त रोहित्रे:नादुरुस्त रोहित्रे तत्काळ बदलण्याची मोहीम सुरू

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे वितरण रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते बदलण्याची मोहीम सध्या महावितरणकडून सुरू आहे. १७ दिवसांमध्ये नादुरुस्त झालेल्या ७१३८ पैकी ६५१६ रोहित्र केवळ ४८ ते ७२ तासांच्या कालावधीत बदलण्यात आले आहेत.

तर गेल्या दोन दिवसांमध्ये नादुरुस्त झालेली केवळ ६२२ नादुरुस्त रोहित्रे बदलणे शिल्लक असून तीदेखील तात्काळ बदलण्यात येत आहेत. तर महावितरणकडे सद्यस्थितीत तब्बल ४ हजार १८ रोहित्रे बदलण्यासाठी अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध आहेत.ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीजजोडणी थकीत व चालू वीजबिलांपोटी खंडित करू नये तसेच नादुरुस्त झालेले वितरण रोहित्र सुरळीत करण्याचे सांगिले आहे.

बातम्या आणखी आहेत...