आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:गाय चारण्याच्या किरकोळ वादातून कुऱ्हाडीने वार करून शेतकऱ्याचा खून, अंबड तालुक्यातील करंजळा येथील घटना

अंबडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गाय चारण्याच्या किरकोळ वादातून कुऱ्हाडीने वार करून शेतकऱ्याचा खून करण्यात आल्याची घटना अंबड तालुक्यातील करंजळा येथे बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.

अंबड तालुक्यातील करंजळा येथील शेतकरी रामा पिराजी घुगे (४८) यांची गाय शेतालगत असलेल्या अशोक रामा सावंत यांच्या शेतात दुपारी चरत होती. आमच्या शेतात गाय का चारली, या कारणावरून बुधवारी रात्री ११ वाजता वाद झाला. त्यानंतर अशोक सावंत यांच्यासह सहा जणांच्या गटाने काठ्या, कुऱ्हाडीने रामा घुले यांच्यावर हल्ला चढवून त्यांना जागीच ठार केले. घटनेची माहिती मिळताच गोंदी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुभाष सानप यांनी पोलिस अंमलदार मदन गायकवाड, संदीप कुटे, नागरगोजे यांच्यासह तातडीने घटनास्थळ गाठून सहा संशयितांना ताब्यात घेतले. मृताचा मुलगा अभिषेक घुले याच्या फिर्यादीवरून गोंदी ठाण्यात अशोक सावंत, लहू सावंत, दत्ता सावंत, रामेश्वर सावंत, शंकर धुमक आणि भगवान धुमक यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.

बातम्या आणखी आहेत...