आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शेतकरी पुत्र झाला राज्य कर निरीक्षक; यावल पिंपरी तांडा येथील बाळू पवारची यशाला गवसणी

रांजणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथ्ून जवळच असलेल्या यावल पिंपरी तांडा येथील बाळू रामनाथ पवार या शेतकरी पुत्राने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तुंग भरारी मारली असून त्याची राज्य कर निरीक्षक म्हणून निवड झाली आहे.रांजणी येथील सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतून बाळू पवार याने दहावीची परिक्षा उत्तीर्ण केली होती.

पुढे जालना येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयातून त्याने बी. एस. सी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर स्पर्धा परिक्षेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत यश संपादन केले. या परिक्षेतून त्याची राज्य कर निरीक्षक म्हणून निवड झाली. या निमित्त रांजणी येथील सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे स्थानिक अध्यक्ष नानासाहेब देशमुख यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना बाळू पवार याने सांगितले की, ध्येय आणि चिकाटी आणि अभ्यासात सातत्य असेल लक्ष गाठणे अवघड नाही. कुठल्याही परिस्थितीत आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून अधिकारी होण्याचा चंग उराशी बाळगून अधिकारी होण्याची माझी प्रतिज्ञा होती. अपार मेहनत घेऊन ही प्रतिज्ञा पुर्ण केली. माझ्या स्वप्नपूर्तीसाठी आई-वडील आणि कुटुंंबाचा मोठा हातभार लागला. या वेळी मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक विश्वरुप निकुंभ म्हणाले की, अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांने स्पर्धा परिक्षेत यश संपादन करत उच्चपदी नियुक्ती व्हावी ही संस्थेसाठी अभिमानाची बाब असुन जमेची बाजु आहे.

या पुढे संस्थेतील विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे स्पर्धा परिक्षेत भरारी घेवून विविध क्षेत्रात अनेकानेक अधिकारी होण्याचे स्वप्न पुर्ण करावे असे मत व्यक्त केले. या वेळी शालेय अध्यक्ष नानासाहेब देशमुख, मुख्याध्यापक विश्वरुप निकुंभ, पर्यवेक्षक अतुल हेलसकर, शिक्षक व्ही. के. पाटील, सोनवणे, अंभोरे, पत्रकार असलम कुरेशी आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...