आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य:पारध येथे घराला आग लागून रोख रकमेसह साहित्य जळाले

पारधएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथे गुरुवारी दुपारी एका घराला आग लागून घरातील रोख रकमेसह संसारोपयोगी वस्तू, मोबाईल आणि घरात ठेवलेले महत्त्वाचे कागदपत्रे जळून खाक झाले.

येथील रहिवासी अनिल यमनाजी भोरकड हे गुरुवारी सकाळी कुटुंबासह शेतात सोयाबीन मळणीच्या कामासाठी गेले होते. तत्पूर्वी त्यांनी सकाळी देवघरात दिवा लावलेला होता. दुपारच्या सुमारास उंदराने तो पेटता दिवा खाली पडला त्यामुळे आजुबाजूचे कागदानी पेट घेतला. माञ दुपारची वेळ असल्याने आजूबाजूला कोणीच नव्हते आणि घराला कुलूप लावलेले त्यामुळे क्षणार्धात संपूर्ण घरात आगीने रौद्ररूप धारण केले. तें

व्हा थोड्या अंतरावर असलेल्या गजानन कॉम्पुटर सेंटर संचालक योगेश भोरकडे आणि काही दुकानदार धावत गेले त्यांनी घराची कुलूप तोडली आणि आग विझवली मात्र तो पर्यंत घरात ठेवलेले नगदी २० हजार रुपये, धान्य, महत्वाची कागदपत्रे आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. या नुकसानीचा पंचनामा करून भोरकडे यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी रवी लोखंडे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, पारध आणि परिसरात मागील पंधरवड्यात अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. भोरकडे यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच आता घरात आग लागून मोठे नुकसान झाल्याने आर्थिक संकट ओढावले आहे.

बातम्या आणखी आहेत...