आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण:जालना शहरात मुलींसाठी घेण्यात आले पाचदिवसीय सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अग्रशक्ती बहू मंडल व साहस फाउंडेशन यांच्या संयुक्त विदमाने पाचदिवसीय सेल्फ डिफेन्स संरक्षण शिबिर राष्ट्रीय हिंदी विद्यालय जालना या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.

या ठिकाणी दामिनी पथकाच्या पथकाच्या प्रमुख रंजना पाटील तसेच त्यांची टीम व दामिनी पथक सेल्फ डिफेन्स ट्रेनर दत्ता पवार, निवृत्ती डिघे, अॅड. धनावत, अग्रशक्ति बहु बहुमंडल, प्रेसिडेंट डॉ. प्रिती मलावत, ममता गुप्ता, सुचिता बगडीया मेघा बगडीया यांची सर्व टीम तसेच राष्ट्रीय हिंदी विद्यालयाचे प्रिन्सिपल अग्रवाल सर यांची उपस्थिती होती. मोठ्या संख्येने मुलींनी या सेल्फ डिफेन्स कार्यक्रमात भाग घेतला होता.

वर्षभर उपक्रम : विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून जालना शहरातील विविध ठिकाणी हे प्रशिक्षण आयोजित केले जातात. यासाठी विविध सामाजिक कार्यकर्त्यांची मदत होत असते.

बातम्या आणखी आहेत...