आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळ:पाच महिन्यांचे पुरुष जातीचे अर्भक सापडले ; अवैध गर्भपात प्रकरणाचा पर्दाफाश

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात अवैध गर्भपात प्रकरणाची घटना ताजी असतानाच जालना शहरातील भीमनगर येथील एका गोडाऊनजवळील कचऱ्यात मंगळवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास पाच महिन्यांचे पुरुष जातीचे मृत अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.जालना शहरातील ढवळेश्वर भागातील एका क्लिनिकवर छापा टाकून पोलिसांनी अवैध गर्भपात प्रकरणाचा पर्दाफाश केला होता.

या प्रकरणात चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच जालना शहरातील भीमनगर येथील एका मोकळ्या जागेत हिरव्या प्लास्टिकच्या पिशवीत मंगळवारी अर्भक आढळून आले. काही नागरिकांनी पाहिल्यानंतर याची माहिती सदर बाजार पोलिसांना दिली. यानंतर सदर बाजार पोलिस ठाण्याचे नरोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अर्भक शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी मंगेश चौरे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे अर्भक कोणी फेकले, कुणाचे आहे याबाबत पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. अर्भक आढळून आल्यामुळे भीमनगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...