आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी मंजूर‎:अंबड शहराच्या विकासकामांसाठी पाच‎ कोटी रुपयांचा निधी झाला मंजूर‎

अंबड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात विकास कामासाठी वैशिष्ट्यपूर्ण‎ योजनेंतर्गत आमदार नारायण कुचे यांनी पाच कोटी‎ रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे. यात‎ शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी‎ निर्माण केलेल्या ऐतिहासिक वास्तुच्या संवर्धनासाठी‎ तसेच नगरपरिषद क्षेत्रातील पुष्करणी बारव परिसरातील‎ नुतनीकरण व सुशोभिकरण करणे, व्यापारी संकुलाचे‎ बांधकाम करणे, महाराष्ट्रद्वारचे नुतनीकरण व‎ सुशोभिकरण करणे, अंबड नगरपरिषद इमारतीच्या‎ परिसरात बांधकाम व सुशोभिकरण करणे, गणपती‎ विसर्जन विहीरीचे नुतनीकरण व सुशोभिकरण आदी‎ कामे करण्यात येणार आहेत.

विकासासाठी रीव‎ निधीची तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,‎ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री‎ रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे यांचे आभार‎ मानले आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...