आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:रहदारीच्या नूतन वसाहत रस्त्यासाठी मंजूर होणार 3 कोटी रुपयांचा निधी

जालना3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सर्वाधिक रहदारीचा रस्ता अशी ओळख असलेल्या नूतन वसाहत रस्त्याच्या कामासाठी लवकरच आणखी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांना दिले.शहरातील नूतन वसाहत हा प्रमुख रस्ता आहे. जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद,जिल्हा न्यायालय,जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय या प्रमुख कार्यालयांसह अन्य शासकीय कार्यालयात याच मार्गे जावे लागते. जिल्हा सरकारी रुग्णालयात जाण्यासाठी सुध्दा हाच रस्ता आहे.

या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी आमदार कैलास गोरंट्याल यांनी गेल्या काही महिन्यांपासून राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला.त्यामुळे राज्य सरकारने या रस्त्याच्या कामासाठी २ कोटी रुपयांचा निधी यापूर्वी मंजूर केला होता.परंतु सदरचा निधी अपुरा असल्याने रस्त्याचे काम पूर्ण होणार नाही.ही बाब लक्षात घेऊन आमदार कैलास गोरंट्याल यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली.

यावेळी नूतन वसाहत या रस्त्याच्या कामासाठी मंजूर निधी अपुरा असल्याचे निदर्शनास आणून देत आणखी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. ही मागणी तातडीने मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर रस्त्याच्या कामासाठी लवकरच आणखी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल असे आश्वासन दिल्याचे आमदार गोरंट्याल यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या या रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागेल असा विश्वास आमदार गोरंट्याल यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...