आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जालना:शेअरमधून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत लुटणारी मध्य प्रदेशातील टोळी गजाआड

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बनावट वेबसाइट, शेअरच्या नावाखाली अडीच लाखांची फसवणूक

विजय रावत, बिपीन रावत, आर्यन तोमर, राहूल जैन या नावाने कॉल करीत अशी बनावट नावे सांगून, शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळवून देतो म्हणत ३० हजार भरून घेतले. पहिल्याच आठवड्यात १८ हजार रुपये ग्राहकाला मिळवून दिले. यानंतर अडीच लाख भरा, प्रत्येक हप्त्याला तीस हजार रुपये येईल, असे अश्वासन देऊन मध्य प्रदेशात बसून जालनेकरांची लूट करणाऱ्या पंचवीशीतील पाच जणांची आंतरराज्य टोळी जालन्यात पकडून आणली आहे.

गणेशकुमार कैलासचंद्र केवळ (२४, कंवला, तहसील भानुसुरा), श्रीकांत देवकीसंजीत मीना (२३, कंवला), श्रीकांत देवकीसंजीत गौर (२२, सांजलपुर), मानसिंग रामदयाल गुजर (२३, कंवला), हन्नी मंगल तोतला (२५, बेगनपुरा) अशी आरोपींची नावे आहेत.

जालना शहरातील लक्ष्मण कोंडिबा मुळे (५२, शिक्षक चौधरीनगर, जालना) यांना आरोपीतील एकाने फोन करून त्याचा मोबदला सांगितला. यानुसार मुळे यांनी १८ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन ३० हजार रुपये भरले. यानंतर त्यांना पहिल्याच हप्त्यात त्यांना १८ हजार रुपये ऑनलाइन पाठवले. यानंतर अडीच लाख भरा नंतर आठड्याला ३० हजार रुपये येईल, असे सांगून पैसे भरून घेतले. परंतु, नंतर चालढकल केल्याने त्यांनी तक्रार दिली. यात हा प्रकार उघड झाला. मध्य प्रदेशातून त्यांना अटक करीत त्यांच्या ताब्यातून २ संगणक, हार्डडिस्क, लॅपटॉप आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, डीवायएसपी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, सहायक निरीक्षक संभाजी वडते, तराळ, पितळे, जारवाल, राऊत, सागर बावस्कर आदींनी केली आहे.

या वेबसाइटहून व्यवहार
www.moneygrowthsolution.com व www.redinvestore.com या वेबसाइटच्या माध्यमातून आरोपींनी शेअर मार्केट बाबत खोटी माहिती देऊन ती खरी असल्याचे भासवून जालन्यातील शिक्षकाची फसवणूक केली आहे.

बँकांचे खाते सील
आरोपींच्या बँकेचे खाते पोलिसांनी संबंधीत बँकांना पत्र देऊन बंद केले आहेत. अजून कुणाची फसवणूक होणार या उद्देशाने ते बंद करून ठेवले आहेत. या आरोपींना पाच दिवसांचा पीसीआर देण्यात आला आहे.