आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेवराई येथील शासकीय रुग्णालयात दि. १२ डिसेंबर राेजी प्रसुती झालेल्या १२ मातांचे औक्षण करत त्यांना साडी व त्यांच्या नवजात मुलांना १ सोन्याची अंगठी, ड्रेस देऊन सन्मानित करण्यात आले. हा स्तुत्य उपक्रम बी.एम.प्रतिष्ठाणच अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांचा वाढदिवस तसेच भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त राबवला.
बी.एम.प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मस्के हे नेहमीच कोणते ना कोणते उपक्रम राबवत असतात. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा.शरद पवार तसेच भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती १२ डिसेंबर रोजी असते. या निमित्ताने बी.एम.प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांनी एक आगळावेगळा आदर्श उपक्रम राबवण्याचा मानस केला.
त्यानुसार गेवराई शासकीय रुग्णालयात दि. १२ डिसेंबर राेजी प्रसुती झालेल्या १२ महिलांचे औक्षण मंगळवारी करण्यात आले. यानंतर त्यांना साडी, तसेच त्यांच्या नवजात मुलांना १ ग्रॅमची सोन्याची अंगठी, कपडे भेट दिला गेला. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.राजेश शिंदे, स्त्री रोगतज्ञ डाॅ. गोपाल रांदड, डॉ. रऊफ मोमीन, श्रीमती संगिता जोगदंड, विजया गायसमुद्रे, स्वाती बारगजे, भाग्यश्री बाबळे आदींसह बी.एम. प्रतिष्ठाणचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
बालकांनी मोठे व्हावे
खा. शरद पवार आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे दोघेही महान आहेत. महाराष्ट्रात अशी माणसे जन्मली हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. युवा पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा. या बालकांनीही भविष्यात मोठे व्हावे आणि सरकारी रुग्णालयातील सुविधांकडे नागरिकांनी यावे, स्त्री जन्माचे स्वागत करावे या उद्देशाने हा उपक्रम राबवला गेला. - बाळासाहेब मस्के, अध्यक्ष, बी. एम. प्रतिष्ठान
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.